बारावी शास्त्र शाखेत दोन वाऱ्या केल्यानंतरही उत्तीर्ण होण्याचाविचार दिसत नाही म्हटल्यावर लातूरला आय. टी. आय. केलं. आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने नोकरीशिवाय पर्यायनव्हता. पाहुणे मंडळींनी नोकरीची हमी दिल्याने लग्न करण्याचाबेत पक्का झाला. वधू संशोधनाचा मुहूर्त पक्का झाला. आमचीस्वारी वडील, चुलते,यांच्यासह सासुरवाडीत (होणाऱ्या ) हजरझाली. वडील व चुलते पाहुण्यांसह इकडच्या तिकडच्या गप्पामारत होते, मी मात्र माझी होणारी ती कुठे आहे, कशी असेल ? तीमला पसंद करील किंवा नाही याचा शोध घेत होतो. अन झालं,पाहुण्यांनी माझ्या होणाऱ्या तिला चहा आणायला सांगितलं. चहाघेऊन येताना माझी 'ती' जेवढी गोंधळी नव्हती तेवढा तिच्यापेक्षाजास्त मीच गोंधळलो होतो. वधू संशोधन झालं. तिनं मला ,मीतिला पसंद केलं, आणि तिचा जीव भांड्यात पडला. त्यानंतरलग्नापूर्वी होणाऱ्या सासुरवाडीला मित्राच्या लग्नानिमित्त गेलो. अक्षता पडल्या, जेवणं झाली पण माझं लक्ष मात्र ठिकाणावरनव्हतं. ती कुठे दिसतेय का?, मला बघतेय का? असं सारखं वाटतहोत. पण तसं काही घडत नव्हतं. शेवटी सासऱ्याच्या बोळातूनजाण्याच्या विचार केला. बोळ अरुंद. घर जवळ आलं तरी काही फायदा नाही. घर ओलांडून पुढे गेलो अनसमोरून साक्षात "ती" येत होती. समोरासमोर येईपर्यंत तिला काहीच कळलं नाही. एकमेकांना धडकणारतेवढ्यात ती थांबली. काळजाचे ठोके वाढले, घामाने दरदरून गेली. तिला वाट करून देऊन पुढे निघूनगेलो.
हुंडा, मान -सन्मानाचा विचार न करता लग्नतिथी नसताना आषाढ महिन्यात लग्न उरकून घेतलं. फारमोठ्या अपेक्षा असताना त्या पूर्ण झाल्या नाहीत. लग्नात बूटही मिळाला नाही, साधी प्लास्टिक चप्पलघेतली होती. मी तीही घातली नाही. पण पुढे माझ्या सौभाग्यवतीने कशाचीच उणीव भासू दिलीनाही.तिच्या प्रेमापुढे काहीच कमी पडलं नाही.इतर लोक आधी प्रेम नंतर लग्न करतात परंतु आम्ही आधीलग्न नंतर प्रेम केलं. त्यामुळे सर्वकाही व्यवस्थित चालू आहे. ऑगस्ट १९८५ मध्ये लग्न झालं. मुलंझाली. वेल मांडवाला गेला.
- अण्णासाहेब भालशंकर
सोलापूर
(१९९८ मध्ये दै. संचार मध्ये 'भेट तुझी माझी स्मरते' या सदर मध्ये प्रकाशित )
No comments:
Post a Comment