सा. बहुजन आवाज गेली ४ वर्ष कार्यरत आहे. बहुजनांचा आवाज बुलंद करण्यासाठी बहुजन आवाज काम करीत आहे. सोलापुरात प्रकाशित होणारे हे साप्ताहिक महाराष्ट्रभर पोहचले आहे. कोल्हापूर पासून गोंदिया ,चंद्रपूर पर्यंत बहुजन आवाज पोहचला आहे. "भीमटोला' नावाने प्रकाशित होणारे सदर तर वाचकांचे खास आकर्षण आहे. नुकतेच भीमटोला पुस्तक रूपाने प्रकाशित झाला आहे. ४ वर्षे न थकता बहुजन आवाज कार्य करीत आहे.
समाजातील वंचित दुर्लक्षित घटकांना समाजाच्या प्रवाहात आणणे, त्यांच्या व्यथा समाजासमोर मांडणे यासाठी आम्ही लेखणी हातात घेतली आहे. जिथे अन्याय होतो मग त्या ठिकाणी सडेतोड प्रहारही केला जातो. सामाजिक न्यायासाठी आम्ही काम करीत आहोत. जातीभेद, धर्मभेद मिटून समतेच्या पायावर या राष्ट्राची ,समाजाची उभारणी व्हावी यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. "अन्यायाला लाथ आणि चांगल्या कार्याला साथ" ही आमची कार्य करण्याची पद्धत आहे.
"चळवळ गतिमान करूया आणि प्रबुद्ध भारत घडवूया" हे ध्येय घेऊन आम्ही दिवसरात्र झटत आहोत. या कामात आपली मोलाची साथ आम्हांला नेहमीच लाभली आहे. भरभरून प्रेम आपण केलं. त्यामुळेच तर हे साप्ताहिक ४ वर्षे सुरु आहे. सोलापुरात चळवळीत अनेक पत्रे चालू झाली पण ती अल्पजीवी ठरली . बहुजन आवाज मात्र एकमेव साप्ताहिक आहे जे सलग ४ वर्षे सुरु आहे. याचे सर्व श्रेय वाचक वर्गाचे आहे असे आम्ही मानतो. पेपरच्या माध्यमातून आम्ही कार्य तर करीत आहोतच. पण नव्या युगाच्या नव्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. काळासोबत चालले पाहिजे. कारण " थांबला तो संपला" त्यामुळे आम्ही नव्या रूपात पदार्पण करीत आहोत. पेपर सोबतच आम्ही आपल्या या नव्या मित्राच्या सहाय्याने संवाद साधू. एकाच वेळी जगभरातील बांधवांशी संवाद साधण्यासाठी हा ब्लॉग आम्ही सुरु करीत आहोत. .
मित्रांनो, "आम्ही येत आहोत नव्या रंगात, नव्या रूपात पण त्याच रुबाबात". निश्चितच याचेही स्वागत होईल याची खात्री आहे.
-अण्णासाहेब भालशंकर
संपादक,
सा. बहुजन आवाज
मो. ७७२२०३५०३६,९८५०८९४३३४

No comments:
Post a Comment