Monday, February 20, 2017

बहुजन आवाज चा अंक आवडला

              
           
  
मागील आठवड्यात प्रकाशित झालेला सा. बहुजन आवाजचा अंक वाचकांना आवडला. पुण्याहून दीप्ती गायकवाड, इंद्रजित गायकवाड, चंद्रपूरहून प्रवीण मुन, अकोल्याहून दिपक वाहुरवाघ, सोलापुरातून अतिश शिरसट यांनी प्रतिक्रिया कळवून बहुजन आवाजचे कौतुक केले. 'व्हॅलेंटाइन डे' च्या निमित्ताने सिद्धार्थ- यशोधरा, ज्योतिबा- सावित्री, भीमराव- रमा यांची प्रेमरूपी मांडणी खरोखर नाविन्यपूर्ण होती. एक नवा प्रयोग बहुजन आवाजने केला आहे. त्याबद्दल वाचकांनी कौतुक केले आहे.
    " खबरदार....! जात बघून मतदान कराल तर " हा भीमटोलाही वाचकांना खूप आवडला. सोलापुरातील शरद वाघमारे यांनी भीमटोलाने रोखठोक आणि गरजेची भूमिका मांडली आहे. समाजाने त्याचा स्वीकार आणि अवलंब करावा, अशी प्रतिक्रिया  समक्ष भेट झाल्यावर  दिली.
       सर्व वाचक वर्गाचे आम्ही आभार व्यक्त करतो. बहुजन आवाज आणि भीमटोला आपली योग्य आणि रोखठोक भूमिका मांडत राहील याची ग्वाही देतो.
            -संपादक
      अण्णासाहेब भालशंकर


No comments:

Post a Comment