वाचकांचा आवाज |
व्हॅलेंटाइन डे ची मांडणी सुध्या अप्रतिम. त्यांच्या कल्पक बुद्धीला तोड नाही. आजच्या तरुण पिढीला 'व्हॅलेंटाइन डे' म्हणजे नेमके काय हे त्यांनी अतिशय चांगली उदाहरणे देऊन समजावून सांगितले आहे. महापुरुषांची खरोखर वेगळी मांडणी यातून झाली आहे असे मला वाटते. बदलणाऱ्या जीवनशैलीला त्यांच्याच भाषेत महापुरुष समजावून सांगण्याची नवीन पद्धत बुद्धजय यांनी निर्माण केली आहे. असा प्रयोग या पूर्बी कुणीच केला नव्हता. आजच्या युवकांसमोर हा आदर्श गरजेचा होता. बहुजन आवाजचा मागचा अंक खूपच नाविन्यपूर्ण होता आणि तो संग्रही ठेवण्यासारखा आहे. बहुजन आवाजच्या वाटचालीस हार्दीक शुभेच्छा !!!!
आयु. सतीश सोनवले
जैन गुरुकुल प्रशाला, सोलापूर
No comments:
Post a Comment