विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही.....
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही
छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही
माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे..
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही..
रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर..
डोळ्यांत जरी गेली धूळ,
थांबण्यास उसंत नाही..
येतील वादळे, खेटेल तुफान,
तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही
- सुरेश भट
शोषित पिडित सर्वत्रच असतात. फक्त बहूजन म्हणून संकुचित विचार का करता. हातच्या टाकणारा आरसा कशाला. आपणास मनापासून भावलेले विचार मांडले आहेत ते "सुरेश" नावाच्या एका भटाने
ReplyDeleteम्हणजे तुम्हाला बोलायचं काय आहे ??
DeleteNicely written by writer
ReplyDeleteJay shivray. Jay shahu Jay jotiba Jay bhim
ReplyDeleteनवतरूनास प्रेरणा देतील शब्द इतके कठोर..
ReplyDeleteअसेल जरी भट नावाने घडतील खूप थोर..
Jay shivray🚩🚩🚩
ReplyDeleteJay shivaray bhau 🚩
DeleteMotivating
ReplyDeleteThanks and that i have a neat provide: How Much House Renovation Cost Philippines house renovation mortgage
ReplyDelete