Thursday, March 9, 2017
Tuesday, March 7, 2017
बायकोचे नटणे आवडले; सोशल मीडिया वरही भीमटोलाची चर्चा
बायकोचे नटणे आवडले; सोशल मीडिया वरही भीमटोलाची चर्चा
-----------------------------------------
मागच्या अंकात प्रकाशित झालेला "अजून किती दिवस दुसऱ्याची बायको नटविणार?" हा भीमटोला वाचकांना खूप आवडला. सोशल मीडिया वरही हा भीमटोला शेयर करण्यात आला. अनेक व्हाट्स अप ग्रुप मध्ये हा भीमटोला फिरत होता. अनेक वाचकांनी पेपर सोबतच ब्लॉग वर ही हा भीमटोला वाचला. भीमटोलाने सडेतोड आणि वास्तवदर्शी भूमिका मांडली आहे अशी प्रतिक्रिया अनेक वाचकांनी दिली. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या बंगलोर येथील अधिकारी मोनाली मेश्राम यांनी भीमटोलाच्या कल्पकतेचे कौतुक केले.
वेगळ्या मांडणीतून राजकीय विषय मांडला असून समाजाला विचार करायला लावणारा हा भीमटोला आहे अशी प्रतिक्रिया सांगलीहून आशुतोष कसबे,पुण्यातून महेश लोंढे ,सोलापुरातून विजयकुमार लोंढे, अंगद जेटिथोर यांनी दिली.महेश क्षिरसागर यांनाही हा भीमटोला आवडला. खबरदार...! जात बघून मतदान कराल तर हा भीमटोला सुद्धा खूप छान होता अशी प्रतिक्रिया सोलापुरातील वाचक अंजली साबळे यांनी दिली. बहुजन आवाजचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे. वाचकांच्या प्रेमाबद्दल आम्ही आभारी आहोत.
-संपादक
(भीमटोला वाचण्यासाठी येथे क्लिक करा )
http://bhimtola.blogspot.in/2017/02/blog-post_26.html?m=1
Monday, March 6, 2017
विझलो आज जरी मी,
विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही.....
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही
छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही
माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे..
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही..
रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर..
डोळ्यांत जरी गेली धूळ,
थांबण्यास उसंत नाही..
येतील वादळे, खेटेल तुफान,
तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही
- सुरेश भट
Friday, March 3, 2017
कैकाडी समाजाच्या चिमुकल्याने गाजविला ऑस्कर सोहळा
बाल अभिनेता -सनी पोवार |
२०१५ मध्ये "लायन" या हॉलिवूडच्या चित्रपटासाठी मुंबई, पुण्यातील सुमारे २००० मुलांमधून सनीची निवड करण्यात आली. "लायन" या चित्रपटात त्याने ५ वर्षाच्या "सरू" या मुलाची व्यक्तिरेखा साकारली आहे. "आम्ही शिकलो नाही मात्र सनीला आम्ही शाळा पण शिकवणार आणि चित्रपटात कामही करायला देणार " असे सनीचे वडील दिलीप पोवार म्हणाले.
सनी कलिना येथील एअर इंडिया मॉडर्न या शाळेत शिकतो. दुभाषाच्या मदतीने त्याने चित्रपटातील प्रसंग समजावून घेतले. सनी कैकाडी समाजाचा असल्यामुळे त्याच्या घरी तेलगू व कानडी मिश्रित भाषा बोलली जाते. त्यामुळे त्याची संभाषणाची भाषा हिंदी आहे. सनी ज्या परिसरात राहतो तेथेही अनेक कैकाडी समाजची घरे आहेत. 'आमच्या समाजातील मुलाने खूप नाव कमावले' असा आनंद ते व्यक्त करतात. ऑस्कर सोहळ्यातील सनीचे छायाचित्र त्याच्या राहत्या घरी झळकत आहे.
मुलाने नाव कमविले;वडिलांनी नोकरी गमावली
मुलासोबत दौऱ्यावर राहिल्याने पालिकेच्या सफाई विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या दिलीप पोवार यांना कामावर हजर न राहिल्याने आपली नोकरी गमवावी लागली आहे. मुलाने नाव कमविल्याचा आनंद दिलीप यांना आहे मात्र नोकरी गेल्याने त्याला दुःखाची झालरही आहे. सनी याची आई घरकाम करून घर चालविते.
Subscribe to:
Posts (Atom)